Marathi poems,Inspirational Quotes,Photos,Real Life Stories......
Sunday, April 11, 2010
........ SWEET COLLECTION BY ME........राहून गेलंय आपलं नातं!
राहून गेलंय आपलं नातं! बसलो होतो मीबराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...सुचतच नव्हते काहीमनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेनआणि सरळ आठवायला घेतले तुलातुझ हसणं आठवलंतसे टपटपले दोन-चार शब्द कागदावरतुझ चिडणं आठवलंतश्या उमटून गेल्या दोन-चार ओळीमलाही मग आला उत्साहआठवत गेलो तुला खूप खूप...तसे तरंगत आले चुकार शब्दआणि बसले शहाण्यासारखेएकेका ओळीत गुपचूप...मग मी आठवल्या त्या कातरवेळाती संकेतस्थळं आणि ती चांदरात...तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनीलपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...कागद भरुन गेला पार...छान कविता होत होती तयार...आता शेवटच राहिला होता फक्तबाकी सगळं जमलं होतं मस्तअन मला कुठुनसं आठवलंआपलं झालेलं भांडणतुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्दपरत थोडा मागे गेलोजुनं-जुनं आठवू लागलोहाताला लागले काही निसटणारे क्षणलिहिलंही मी कागदावर काहीबाहीपण ते माझं मलाच पटलं नाही...जसं आपलं भांडणकधी कध्धीच मिटलं नाही...माझं मीच मग समजावलं मलाकधी कधी असं होतंराहते एखादी कविता 'अपूर्ण'चजसं राहून गेलंय आपलं नातंजसं... राहून गेलंय आपलं नातं!
ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक
........ SWEET COLLECTION BY ME........
VANESH MALI
(9372883361)
राहून गेलंय आपलं नातं!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment